नामांतराच्या विरोधात खा. इम्तीयाज जलील यांचे आजपासून उपोषण

छत्रपती संभाजी महाराज नगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांचे नाव बदलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात खासदार जलील हे आजपासून आमरण उपोषण सुरू करत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. मात्र या निर्णयाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

दरम्यान, खासदार इम्तीयाज जलील यांच्यासोबत अनेक सामाजिक कार्यकर्ते या उपोषणा सहभागी होणार आहेत. नामांतरविरोधी कृती समितीच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. यास विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी समर्थन दिले आहे. शहराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख पुसू देणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content