मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती जी .जी .खडसे महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे खेळाडूचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे.
श्रीमती जी .जी .खडसे महाविद्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा वाढदिवस असलेल्या खेळाडूला एक झाड (रोपट)भेट देऊन त्याची लागवड महाविद्यालय परिसरात लावण्याची नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात क्रीडा विभागातर्फे करण्यात आली. हा उप्रकमास बॉल बॅडमिंटनचा राष्ट्रीय खेळाडू पंकज खिरोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे मा.प्र. प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांची उपस्थिती होती. या उपक्रमाचे प्राचार्यांनी क्रीडा विभागाचे कौतुक करून अशा आदर्श विचारांचे युवक ही आपल्या विकसनशील देशाची खरी संपत्ती आहे. हा उपक्रम नियमितपणे सुरू ठेवणे ही तेवढीच आवश्यक बाब असल्याचे त्यांना निदर्शनात आणून दिली.
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे- खेवलकर, उपप्राचार्य डॉ. ए. पी. पाटील व प्राध्यापकांनी कौतुक केले. क्रीडा संचालक डॉ. प्रतिभा ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल बोदडे, अनुराज बोदडे, कृष्णा साळुंखे, गितेश कात्रे, अजय कोळी, हेमराज सपकाळे ,कृष्णा पालवे, चारू चौधरी , पुनम दुट्टे, पुनम मेढे, सईदा शेख, माजी खेळाडू सागर नानोटे यांनी उपस्थिती देऊन असा अनोखा उपक्रम सुरू केला.