मालेगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पीएफआयशी संबंधित असलेल्या संशयिताला एनआयए (NIA)च्या मुंबई पथकाने काही महिन्यांपुर्वी अटक केली होती. हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. आता रविवारी पहाटे नाशिक जिल्ह्यातील मालेगावातून एकाला एनआयए NIA पथकाने ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. अधिक चौकशीसाठी पुन्हा बोलावण्यात येईल या अटीवर सोडण्यात आले आहे.
दहशतवादी कारवाया करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव हे एक मुख्य केंद्र होत असल्याचे पहावास दिसून येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगावात एनआयएने कारवाई केली आहे. शहर पोलीस ठाणे हद्दीतील मोमीनपुरा भागात राहणाऱ्या गुफरान खान सुभान खान याच्या घरी रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास झाडाझडती घेत त्याला घरातून ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात नेले. गुफरानचा परदेशात कोणाशीतरी संपर्कात असून मोबाईलवरुन परदेशात कॉल करतो, तसेच तो पीएफआय (PFI) संघटनेचा सदस्य असून तो मुलांना फिजिकल ट्रेनिंग देण्याचे काम करत असल्याचा त्याच्यावर संशय होता. एनआयएच्या मुंबई टीमने त्याला ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तिथे त्याची पाच तास चौकशी करुन सोडलं. चौकशीसाठी पुन्हा बोलावण्यात येईल असं सांगून एनआयएने त्याला सोडण्यात आले आहे. बईहून आलेल्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये संशयिताची दहशतवादी कारवायांच्या कारणावरुन चौकशी झाली.