अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलीसांचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केटमधील बी. विंगच्या पायथ्याशी अंदाजे ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह शनिवारी १२ रोजी सकाळी जखमी अवस्थेत मिळून आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील न्यू बी. जे. मार्केट परिसरात अनोळखी एका ४० वर्षीय तरुणाचा मृतदेह शनिवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी आढळून आला. या तरुणाच्या डोक्यालासह शरिरावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यासोबत घातपात झाल्याची शक्यात वर्तविली जात होती. परंतु पोलिसांनी घटनास्थळी जावून तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यामध्ये त्या तरुणाने जमिनिवर स्वत: डोके आपटत असल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना उघडकिस आल्यानंतर त्या अनोळखी तरुणाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष सोनवणे यांनी केले आहे.

Protected Content