खेडी खुर्द येथे पोलिसांनी केली १९ हजाराची गावठी दारू नष्ट

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी खुर्द येथे एरंडोल पोलिसांनी बेकायदेशीर  गावठी दारू नष्ट केली.

एरंडोल तालुक्यातील खेडी खुर्द येथे वसंत बुधा सोनवणे (वय-५० रा. खेडी खुर्द तालुका एरंडोल) हा ईसम गावठी हातभट्टी च्या दारु तयार करण्यास लागणारे व उपयुक्त असणारे गुळ,नवसागर,पाणी मिश्रीत व भट्टीच्या साधनां सह-भट्टी रचुन गावठी दारु पाडत आहे, अशी खात्रीशीर गुप्त बातमी मिळाल्याने ९ रोजी २०२० रोजी दुपारी ४ वाजता छापा टाकुन एरंडोल पोलिसांकडून १९ हजाराची गावठी दारू  जप्त करण्यात आली.

तसेच एरंडोल तालुक्यातील विखरण शिवारातील वन विभागाच्या जागेत रविंद्र गुलचंद भिल रा.विखरण ता.एरंडोल हा इसम गावठी हातभट्टीची दारू तयार करीत होता. त्यावेळी एरंडोल पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल उनवणे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तुषार देवरे,पो.हे.कॉ.रविंद्र सपकाळे,पो.ना.अकिल मुजावर, पो.ना.महेंद्र पाटील,होमगार्ड नितीन पाटील,नंदलाल वानखेडे यांनी अचानक छापा टाकुन २०० लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट केले. दोघांवर एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
संशयित आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एरंडोल पोलिस स्टेशनचे सपोनि स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे काॅ चंद्रकांत पाटील, पोलिस नाईक राहुल बैसाणे, पोलिस काँन्सटेबल मिलिंद कुमावत यांनी कार्यवाही केली तसेच गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस नाईक राहुल बैसाणे हे करीत आहेत

Protected Content