अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता  रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. ही मुलगी गुरूवारी ६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता घरी असतांना तीला कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीने फूस लाावून पळवून नेले. ही घटना मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी नातेवाईकांसह संपुर्ण परिसरात तीचा शोध घेतला. मात्र तरी देखील ती मिळून न आल्याने अखेर शुक्रवारी ७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीदास गभाले हे करीत आहेत.

Protected Content