ढाबा चालकास मारहाण प्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

 

भुसावळ, प्रतिनिधी । ढाबा चालकाला शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी मागण्याच्या प्रकरणात दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी भगवान वामन वानखेडे हे बालाजी तोल काट्याच्या पाठीमागे खडका रोड येथे राहतात. त्यांना नॅशनल हायवे क्रमांक सहा पेट्रोल पंपाच्या समोरील यश ढाब्यावर दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी रात्री ११.३० ते १२.०० वाजेच्या सुमारास चौघांनी शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी मागितली. यात आरोपी हाशिम शेख सलिम (रा. रिंग रोड भुसावळ), सिद्धार्थ श्रावण साळुंखे (रा. सत्यसाईनगर भुसावळ), दानिश रजउल्ला शेख (रा. सत्यसाईनगर भुसावळ), चौथा आरोपी अल्पवयीन असून फरार आहे. चौघांनी ढाबा चालकास शस्त्राचा धाक दाखवून २,००० हजार रुपयांची खंडणीची मागणी केली असता ढाबा चालकाने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग येवून एकाने लोखंडी तलवार उलटी डोक्यात मारली. दुसऱ्याने लोखंडी रॉडने तर सोबतच्या साथीदाराने चपटा-बुक्यांनी मारहाण केली होती. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुरुन ९७७/२०२० प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील आरोपी हाशिम शेख सलिम व सिद्धार्थ श्रावण साळुंख दोघांना बाजारपेठ ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता दोघांना चार दिवसाची पोलीस कोठडी सूनविण्यात आलेली आहे. तर सिद्धार्थ श्रावण साळुंख या आरोपीस दिनांक १/१/२०२१ रोजी ताब्यात घेण्यात आले असून चौथा आरोपी फरार असून शोध सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून गुन्ह्याचा तपास बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश धुमाळसह सुभाष साबळे करीत आहे.

Protected Content