सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सांगलीतील एका कॅफेत अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराची घटना घडली आहे. त्या मुलीला गुंगीचे औषध देत अश्लील व्हिडिओ तयार केले. त्यांनतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, पीडत मुलीला शंभर फुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफे शॉपमध्ये नेले. तेथे कॉफीमधून तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर मोबाईलमध्ये पीडितेचे अश्लील व्हिडिओ काढले. नंतर ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने जबरदस्तीने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
