जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दारूसाठी पैसे न दिल्यामुळे एका मुलाने पित्याची हत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील घडली आहे. ही घटना १६ मे रोजी गुरूवारी सहा वाजेच्यासुमारास तालुक्यातील पळासखेडा या गावात घडली आहे. राजाराम पवार असे मृत पित्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलाने पित्याची दारूसाठी पैसे न दिल्यामुळे पोटात चाकूने वार करत गळा चिरून हत्या केली आहे. सुमित पवार असे आरोपी मुलाचे आहे. राजाराम पवार हे सुप्रीम कंपनीत पाइप वाहतूक करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे कंपनीतून काम करून ते घरी आले. त्यांची पत्नी काही कामानिमित्त फर्दापूर येथे गेल्या होत्या. त्यावेळी मुलगा सुमित पवार हा घरी एकटा होता. त्यांने दारूसाठी वडिलांकडे पैशाची मागणी केली. त्यांनी पैसे न दिल्यामुळे दोघात वाद निर्माण झाला. त्यांच्या दोघात वाद वाढल्यामुळे मुलाने घरातील चाकूने वडिलांच्या पोटात वार करत गळा चिरला. त्यानंतर त्यांना जामनेर येथील रूग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.




