भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवारी ३० जून रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी १ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. रविवारी ३० जून रोजी सकाळी १०.३० वाजता पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पिडीत मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या नातेवाईकांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड हे करीत आहे.