ग्राहक पंचायत जिल्हा सचिवपदी डॉ. नितीन धांडे यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्राहक पंचायत महाराष्ट्र जळगाव जिल्हा बैठकीत नुकतीच नुतन कार्यकारीणी जाहिर करण्यात आली असून सचिवपदी डॉ. नितीन धांडे यांची निवड करण्यात आली आहे.

नाशिक विभाग संघटक मा.श्री संजय शुक्ला यांचे उपस्थितीत ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या जळगांव जिल्हाच्या कार्यकारीणीत फेरबदल करण्यात येऊन नवीन नियुक्त्या घोषीत करण्यात आल्या आहे. जिल्हाध्यक्षपदी गुरुबक्ष किशनचंद जाधवानी (जळगाव ), उपाध्यक्ष उज्वला मुकुंद देशपांडे (एरंडोल), जिल्हा संघटकपदी प्रल्हाद सोनवणे (रावेर विभाग), सह संघटकपदी युवराज कुरकुरे(भुसावल), सचीव डाँ. नितीन धांडे (जळगाव ), जळगाव शहर संघटक पदी भुपेंद्र मराठे ( पारोळा), सहसंघटकपदी राजेंद्र शिंपी (पाचोरा) यांची नियुक्ती करण्यात आली.

महीला आघाडी प्रमुख अंतीम पाटणी (जळगाव) तर सदस्य म्हणुन डाँ.अविनाश सोनगिरकर, मनिषा पाटील, महेश चावला, चंद्रकांत वाणी, मनोज जैन, उदय अग्निहोत्री यांची निवड करण्यात आली. सर्व नुतन पदाधिकारी यांचा सत्कार मावळते अध्यक्ष मनोज जैन सचीव उदय अग्निहोत्री, विभाग संघटक संजय शुक्ल यांचे हस्ते करण्यात आला.

Protected Content