कचरा टाकण्यावरून वृध्दाला लोखंडी सळईने केली मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एकरूपी गावात घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून एका ६६ वर्षीय वृध्दाला लोखंडी सळई व लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ३० जून रोजी सकाळी ६.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १ जुलै रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ जुलाल पाटील वय ६६ हे वृध्द आपल्या परिवारासह अमळनेर तालुक्यातील एकरूपी गावात वास्तव्याला आहेत. ज्यांच्या घराच्या शेजारी राहणारे समाधान रोहिदास पाटील यांनी वृध्दाच्या घरासमोर कचरा टाकला. त्यावरून त्यांनी घरासमोर कचरा टाकू नका असे सांगितल्याच्या राग आल्याने शेजारी समाधान रोहिदास पाटील, रोहिदास आसाराम पाटील, अनिल धर्मा पाटील, भरत वामन पाटील, वामन आसाराम पाटील, सरलाबाई रोहिदास पाटील सर्व रा. एकरूपी ता. अमळनेर या सर्वांनी रविवारी ३० जून रोजी सकाळी ६.३० वाजता एकनाथ पाटील यांनी शिवीगाळ करत लोखंडी सळई व लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत एकनाथ पाटील यांनी सोमवारी १ जुलै रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ लक्ष्मीकांत शिंपी हे करीत आहे.

Protected Content