सोशल मीडियावर मैत्री करून अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार

पालघर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रातील पालघर जिल्हयातून सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडीत मुलीशी आरोपीने सोशल मीडियावर मैत्री केली असता तिला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पीडित मुलगी ही १८ वर्षांची असून आरोपींचे वय २० वर्ष आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीपैकी एका मुलाने इंस्टाग्राम या सोशल मीडिया ॲपवर पीडितेशी मैत्री केली असता दोन्हीमध्ये मैत्री वाढली आणि त्यांनी भेट घेण्याचे ठरवले होते. ३० एप्रिल रोजी आरोपी तरूण पीडितेला आपल्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा ४ मे रोजी आणखी एका तरूणासोबत आरोपीने पीडीतवर वेगवेगळया ठिकाणी बलात्कार केला. बलात्कार झाल्यानंतर पीडिता घरी पोहचली असता तिची अवस्था पाहून कुटुंबियांना धक्का बसला.

कुटुंबियांनी मुलीची विचारपूस केल्यावर पीडितने सर्व प्रकार सांगितला असता कुटूंबियांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. तसेच, ओळख लपवण्यासाठी त्यांनी बनावट नावांचाही वापर केला होता. परंतु, पोलिसांनी दोघांचा कसून शोध घेतला आणि पाळत ठेवून त्यांना पकडले. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही आरोपींना ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Protected Content