ट्रॅक्टरमधून वाळूची अवैधपणे वाहतूक; चालक ट्रॅक्टर घेवून पसार !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलीसांना पाहून चालकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची घटना बुधवार ८ मे रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांनी पोलीसांना कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीसांनी बुधवारी ८ मे रोजी दुपारी ४ वाजता बांभोरी गावात कारवाई केली. यावेळी वाळूने भरलेले ट्रॅक्टर येतांना पोलीसांना दिसले. तर ट्रॅक्टर चालकाने पोलीसांना पाळून वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवन चालक शुभम जयसिंग पाटील रा. पिंप्राळा ता.जि.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहे.

Protected Content