दारू पिऊन पोलीसांनी केली दोघांना मारहाण; जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

जळगाव प्रतिनिधी । शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी दारूच्या नशेत बालाजी पेठेत राहणाऱ्या दोन तरूणांना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. मारहाण केल्याप्रकरणी दोघा तरूणांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दिलेल्या तक्रारीनुसार, शनीपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले माने (पुर्ण नाव माहिती नाही)आडनाव असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल याच्यासह एक होमगार्ड (पुर्ण नाव माहित नाही ) हे दोघे दारूच्या नशेत बालाजी पेठेतील भवानी मंदीराजवळ २१ ऑक्टोबर बुधवारी रात्री १० ते १०.३० वाजेच्या सुमारास आले. मंदीराजवळ असलम खान करीम खान शहा रा. बालाजी पेठ आणि फैजान खान युसुफ खान हे दोघे खाटेवर बसून गप्पा मारत होते.

होमगार्ड दोघांच्या जवळ येवून काहीही कारण नसतांना अर्वाच्च भाषा वापरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. पोलीस पदाचा दुरूपयोग करून हातातील लाकडी काठीने दोघांना बेदम मारहाण केली. यात असलमच्या हनुवटीवर जबर जखम झाली. तर फैजल खान याचा खिश्यातील मोबाईल काढून मोबाईल फोडून नुकसान केले. मारहाण करून पोलीस कर्मचारी माने आणि होमगार्ड निघून गेले. जखमीस असलम याला खासगी रूग्णालयात दाखल केले. पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांची चौकशी करून दोघांना निलंबित करावे, असे जखमी असलम खान करीम खान याने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे तक्रारीचे निवेदन देवून मागणी केली आहे.

 

Protected Content