सक्तीची करवसुली थांबविण्याबाबत राज्यमंत्र्यांना निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । नगर परिषदने सक्तीची कर वसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी शहरवासीयांनी तर्फे नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज (दि.२२) रोजी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. 

नगर परिषदेच्या सक्तीच्या कर वसुली बाबत आज नगर विकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देऊन कोविड-१९ मध्ये अनेकांच्या हाताला काम नसताना अनेकांच्या दैनंदिन दोन वेळच्या जेवणाच्या अडचणी निर्माण झालेल्या असताना तसेच अनेक लोक या कोरोना मुळे मरण पावलेले असताना त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे सावट असताना त्यांना नगरपालिकेकडून मृत्यू दाखला जन्म दाखला विवाह नोंदणी अशा दाखल्याची आवश्यकता असताना नगर परिषदेकडे जर याबाबत मागणी अर्ज केली तर नगरपरिषदेत मार्च 2021पर्यंत कर भरण्याची मागणी केली जाते. 

नागरिकांना मागील चार वर्षापासून कोणत्याही दैनंदिन सुविधा प्राप्त झालेल्या नसताना रस्ते गटारी हायमीस्ट दिवे, 10 ते 12 दिवसांनी मिळणाऱ्या पाण्याची असुविधा तसेच सर्वत्र झालेल्या कचऱ्यांचे ढीग त्यामुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न या सर्व महत्त्वपूर्ण सत्यता राज्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. तसेच नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना शहरवासीयांनी तर्फे विनंती केली की, सक्तीची कर वसुली थांबवावी, तात्काळ मुख्याधिकारी चित्रा वार यांना फोन करून सदर बाब गंभीर स्वरूपाची आहे. आपण यावर तात्काळ आवर घालावा असा फोन केला व नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने त्यांची कार्यपद्धती दिसून आली.

Protected Content