शिलाई मशीनच्या मोटारीवरून दोन गटात तुफान राडा.

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शिलाई मशीनसाठी लागणारे मोटार परत देण्याच्या कारणावरून भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भडगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील रहिवाशी चंद्रकांत माधवराव अमृतकर (वय-५१) यांनी गावातील भगवान रामदास शिंपी यांच्या ओळखीने शिलाई मशीनसाठी लागणारे ईलेक्ट्रीक मोटार चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथून घेतली होती. मोटार खराब झाल्याच्या कारणावरून चंद्रकांत अमृतकर आणि भगवान शिंपी यांच्यात सोमवारी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजता वाद झाला त्यानंतर दोघांचे नातेवाईक एकमेकांना भिडले. यात लाठ्या काठ्या, लोखंडी कैची, मीटर पट्टी, ब्लेड यांचा वापर करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही गटाने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पहिल्या गटातील भगवान रामदास शिंपी, गणेश रामदास शिंपी, संजय रमेश शिंपी, विलास रमेश शिंपी, प्रमोद रमेश शिंपी, संतोष रमेश शिंपी तर दुसऱ्या गटातील चंद्रकांत माधवराव अमृतराव, चंद्रकांत यांची पत्नी आणि सुनिल माधवराव अमृतकर यांच्यावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक निलेश ब्राम्हणकर हे करीत आहे.

Protected Content