वाहन चालकाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करण्यास सांगत जळगाव शहरातील अयोध्या नगरातील वाहन चालकाची ३१ हजार ६४० रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवार 21 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अयोधनगर परिसरात संदीप अण्णा पाटील व 42 हे वास्तव्यास आहेत. ते वाहन चालविण्याचे काम करतात. 24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास संदीप पाटील हे त्यांच्या घरी असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना क्रेडिट लिमिट वाढवून देण्याचा बहाणा करत मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ॲप डाऊनलोड करताच संदीप पाटील यांच्या खात्यातून 31 हजार 640 रुपये परस्पर संबंधितांनी वळवून घेतले. पैसे परत मिळत नसल्याने तसेच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर याबाबत संदीप पाटील यांनी अडीच महिन्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती . या तक्रारीवरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.

Protected Content