वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । मोहाडीरोडवर पोलीसांनी पकडलेले वाळूचे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा न करता चालक ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची घटना मंगळवारी १८ जानेवारी रोजी दुपारी घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मोहाडी रोडवर मंगळवारी १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसुल विभागाचे कर्मचारी विशाल नगराज सोनवणे यांनी  पकडले. कागदपत्राची विचारणा केली असता वाळू वाहतूकीचा कोणताही परवानगी नसल्याचे सांगितले. त्यानुसार ट्रॅक्टर एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्याचे सांगितले.  मात्र, ट्रॅक्टर चालक हा पोलीस ठाण्‍यात वाळू जमा न करता तेथून पसार झाला. अखेर याप्रकरणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुपारी १२ वाजता ट्रॅक्टर चालकाविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

 

 

Protected Content