पारोळा येथे शिवजयंतीच्या नियोजनाबाबत शेतकरी संघटनेची बैठक

पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त पारोळा शहरात विविध कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज सोमेश्वर महादेव मंदिर येथे सुनील देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विकास सोनवणे, पत्रकार अभय पाटील, पत्रकार विशाल महाजन, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विनोद चौधरी, कार्याध्यक्ष गुलाब पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन हाटकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रमुख जितेंद्र पाटील, राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष संजय बागडे, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानचे सचिव निलेश मराठे, शहर संघटक राज चौधरी, सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते निंबा मराठे, साई संस्थानचे जगन महाराज, सर्वज्ञ संस्थेचे अध्यक्ष अरूण जगताप, नवोतेज संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र सोनवणे, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे कंकराजचे कार्याध्यक्ष ललित पाटील, मेहू शाखेचे शाखा अध्यक्ष रावसाहेब पाटील, पारोळा शहर संपर्क प्रमुख अनिल पाटील, सारवे येथील संघटना प्रतिनिधी नितीन पाटील, सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, जयेश भोई, मोहन पारधी, सुभाष माळी यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

ठराव या बैठकीत पोलिस व प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करण्यात यावे. शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व रँली,शोभायात्रा, पालखी सोहळा, मिरवणूक,निघतील ते एकसुत्र कार्यक्रम व नियोजन करण्यात यावे. शहरातील सर्व आयोजकांनी आपसात सविस्तरपणे चर्चा करून सोबत नियोजन करावे. असे ठराव मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विनोद चौधरी यांनी केले तर आभार रावसाहेब पाटील यांनी मानले

Protected Content