पारोळा शहरात आता दर सोमवारी ‘जनता कर्फ्यू’

पारोळा प्रतिनिधी । कोरोनाचा प्रकोप वाढत असतांना आता येथे दर सोमवारी ‘जनता कर्फ्यू’चे पालन करण्यात येणार आहे.

पारोळा नगरपालिका प्रशासन व व्यापारी संघटनेची संयुक्त बैठक गुरूवारी पार पडली. यात दर सोमवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय झाला. प्रत्येक सोमवारी शहराची मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय झाला. याच्या अंतर्गत अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

या बैठकीला उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, एपीआय नीलेश गायकवाड, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, उपाध्यक्ष अशोक ललवाणी, विलास वाणी, अरुण वाणी, महेश हिंदुजा, दिनेश गुजराथी, संजय कासार, धर्मेंद्र हिंदुजा, सुनील भालेराव, नगरसेवक पी.जी.पाटील, मनीष पाटील, संजय पाटील, गौरव बडगुजर आदींची उपस्थिती होती.

Protected Content