पारोळा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील शिरसमणी व तामसवाडी, वसंतवाडी या भागातून गुरांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मा बाजीराव पाटील रा, मुंदाने ता.पारोळा हे शेतकरी आहे. त्यांचेसह शिवाजी अर्जुन कुंभार रा. तामसवाडी, भुरेसिंग जगन जाधव रा. वसंतवाडी यांच्या शिरसमणी, तामसवाडी व वसंतवाडी शिवारातून दोन बैल, गाय व दोन लहान गोऱ्हे अशा गुरांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एकूण १ लाख १० हजार रुपये किंमतीचे शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे. याबाबत धर्मा पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार जयवंत पाटील करीत आहे.

 

Protected Content