धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीणमधील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी धरणगावात रविवारी सायंकाळी भव्य रॅली काढली.
शहरात मिरवणुकी दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादुर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय महाजन, शिरीष बयस, शेखर पाटील, पालिका गटनेते कैलास माळी, सुनिल वाणी, सुनिल चौधरी.तसेच लकी टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील यांचे कार्यकर्ते, टोनी महाजन, धरणगाव येथील नगरसेवक गुलाब मराठे, कडू बयस, ललित येवले, महाजन सर,वासुदेव महाजन, दिलीप माळी, दिलीप मराठे, रामचंद्र शिंदे, नितीन चौधरी, नितीन अमृतकर, सुनील महाजन, अनिल महाजन, नाना सजन पाटील, सचिन पाटील, कांतीलाल माळी, भालचंद्र माळी, शरद अण्णा, राजेंद्र येवले,कन्हैय्या रायपूरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.