चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ नांदेड गावात भव्य रॅली

06417a54 7a5e 4e9f 8652 1468a01d6bff

 

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण तसेच धरणगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या जन्मभूमी असलेल्या नांदेड गावात आज भव्य ट्रॅक्टरवर भव्य रॅली काढत झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला.

 

अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार दौरा आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नांदेड गावात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व स्थानिक जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केल. या प्रसंगी नागरिकांनी दौऱ्याला भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी जानकीराम पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस तथा सरपंच बांभोरी प्र.चा. राकेश नन्नवरे तसेच लक्ष्मण गंगाराम पाटील यांचे असंख्य कार्यकर्ते तसेच नांदेड-साळवा-बांभोरी गटातील शक्ति प्रमुख सचिन पाटील, बूथ प्रमुख लक्ष्मण सैंदाणे, विनायक भोळे, सीताराम बर्हाटे, जगदीश कोळंबे आणि गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content