आसोदा रोड येथे लांबविली महिलेची सोन्याची मंगलपोत

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आसोदा रोड मोहन टॉकीजवळ एका महिलेची २५ हजार रूपयांची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, छाया रतन बाविस्कर (वय-३८) रा. मोहन टॉकीजवळ आसोदा रोड जळगाव ह्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गुरूवार २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास छाया बाविस्कर या महिला घराच्या ओट्यावर बसलेल्या होत्या. त्यावेळी अंदाजे ४० वर्षीय वयोगटातील अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. तुमच्या घरात दोष असल्याचे सांगून घराच्या अंगणात पुजेच्या ठिकाणी सोन्याची पोत व कानातले बाही ठेवले होते. महिला घरात चहापाणी करण्यासाठी गेल्या असता पुजेसाठी ठेवलेले मंगलपोत आणि सोन्याची बाही असा एकुण २५ हजार रूपयांचा मुद्देमाल अनोळखी व्यक्तीने चोरून पसार झाला. महिलेने तातडीने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवारी २७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन करीत आहे.

 

Protected Content