‘तू मेरी जिंदगी है’ म्हणत मुलीचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तू मेरी जिंदगी है असे म्हणून हात पकडून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी १९ जून रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. बुधवारी १९ जून रोजी रात्री ८.३० वाजता यशवंत अनिल अहिरे वय २० रा. जळगाव हा मुलीच्या घरात घुसला. तयांनतर तिला तू मेरी जिंदगी है असे म्हणून तिचा हात पकडून अश्लिल चाळे केले. हा प्रकार मुलीने नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी रात्री ११ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार यशवंत अनिल अहिरे रा. जळगाव याच्यावर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मराठे हे करीत आहे.

Protected Content