डॉ. राधेश्याम चौधरी यांची माघार (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 10 07 at 4.23.21 PM

जळगाव, प्रतिनिधी | कॉंग्रेस पक्षातून बंडखोरी करून अपक्ष उमदेवारी दाखल केलेले डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

याप्रसंगी संदिपभैय्या पाटील, डी. जी .पाटील. डॉ. अर्जून भंगाळे, माजी प्रदेश युवक उपाध्यक्ष भैय्यासाहेब अनिल पाटील, अॅड. सलिम पटेल, ब्लॉक अध्यक्ष नदिम काझी, युवक प्रदेश सरचिटणिस बाबा देशमुख, चोपडा तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, युवक शहर अध्यक्ष मुजिब पटेल, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. धनराज चौधरी, लिगल सेलचे अॅड. बी जी पाटील आदि उपस्थित होते. प्रांताध्यक्ष यांना जिल्हा कॉंग्रेस कमिटी व जिल्हा कॉंग्रेसने जळगावची जागा आघाडीत सोडावी अशी मागणी केली होती.  मात्र, आघाडीधर्म पाळतांना तीन पक्षांना सांभाळून घेण्यासाठी काही अडचणी आहेत. परंतु, जळगाव व रावेर ह्या दोन जागा राहतील असे आश्वासन देत अतिरिक्त दोन जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करू असे सांगण्यात आले होते. यावेळी रावेरमध्ये शिरीष चौधरी व जळगाव मधून डॉ. राधेश्याम चौधरी लढतील असा संकेत देण्यात आल्याने डॉ. चौधरी आश्वस्त झाले होते. पदाधिकारी कामाला लागले होते. ३ तारखेला राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित झाला. त्यानंतर प्रयत्न करून आमच्या भावना पुन्हा कळविल्या होत्या. उत्तर महाराष्ट्र प्रभारी वामसे रेड्डी यांनी सीट वाटपातील गफलतीबाबत खंत करत पक्ष हा संक्रमण अवस्थेतून जात असून पक्षाला त्यांच्यासारख्या उच्च शिक्षित व्यक्तींची गरज असल्याचे सांगून माघार घेण्यास सांगितले त्यानुसार आपण माघार घेतली असल्याचे डॉ.राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Protected Content