वाढदिवसाच्या खर्चाला आळफाटा देत गरम-थंड पाण्याचे यंत्र व पाण्याची टाकी दिली भेट

वरणगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या संसर्गामुळे कार्यक्रमांवर बंदी लावण्यात आली आहे. तथापि, वैद्यकीय क्षेत्रावरील खर्च लक्षात घेता, आयुध निर्माणीतील दाम्पत्याने आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचा होणारा खर्च टाळत प्राथमिक आरोग्य केंद्राला गरम व थंड़ पाण्याचे मशीन तसेच एक हजार लीटर पाण्याची टाकी भेट देवून एक आदर्श निर्माण केला आहे. 

प्राथमिक आरोग्यक कद्र पिंपळगांव खुर्द ता.भुसावळ येथे महिलांचे व पुरूषांचे कुटुंब नियोजनाचे शिबीर होत असतात. याठिकाणी एका वेळी २० ते २५ रूग्णांचे कुटुंब नियोजनाचे ्ऑपरेशन होतात. तसेच प्रसुतीसाठी देखील महिला येत असतात. पिंपळगाव खुर्द येथे ओडीए योजने अंतर्ग पाणीपुरवठा होतो. या योजनेवरील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तसेच अवेळी व अपुरा होत  असल्याने अॅडमीट पेंशट यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तसेच प्रसुती झालेल्या महिलांना गरम पाण्याची अवश्यकता असते. आयुध निर्माणीतील विवेक पाटील व सुवर्ण पाटील या दाम्पत्याला २८ मे २०२० ला पुत्र रत्न प्राप्ती झाली होती. तसेच. सध्या कोरनाची महामारी असल्याने अनेक गरीब व  गरजु कुटुंबातील रूग्णाना प्राथमिक आरोग्य केंद्र हे उपचारासाठी सोयीचे असते. या ठिकाणी असलेली हि अडचण सोडविण्यासाठी त्यांनी मुलगा हर्षीत याचा प्रथम वाढदिवसाला होणाऱ्या खर्चाला आळफाटा देत प्राथमिक आरोग्य केंद्राला गरम व थंड पाण्याचे यंत्र दिले.तसेच येथील पाण्याची समस्या निकाली निघावी यासाठी एक हजार लीटर पाण्याची टाकी देखील भेट दिली. सदरची भेट वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.वाय.तडवी, डॉ.नितीन सोनवणे यांच्या सुपुर्द केली.यावेळी त्यांच्या सोबत मधुकर पाटील, आयुध निर्माणीतील जेडब्लूएम एम.डी.बऱ्हाटे, उषा नॅशनल चिल्ड्रन सायन्स रिसर्च सेंटरचे अध्यक्ष जीवन महाजन, सुनिल वानखेडे आदि उपस्थित होते. 

समाजेच देणे लागतो या भावनेतून केली मदत 

वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर खर्च होतो.सदरचा आनंद हा क्षणीक असुन कोरोनाच्या काळात कार्यक्रम घेणे म्हणजे अडचणींना सामोरे जाणे होय.परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिलेल्या वस्तुमुळे अनेकांची सुविधा होणार असुन सदरची बाब ही चिरकाल टिकणारी आहे. यामुळे समाजाचे देणे लागतो या भावनेतून मदत केली असुन यामुळे काही प्रमाणात का होईना इतरांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होईल, असे विवेक(राम) पाटील, (आयुध निर्माणी ) यांनी म्हटले आहे.

सामाजीक दातृत्वाची गरज 

सध्याची परिस्थी बघता अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सर्वच सोयी रूग्णांसाठी उपलब्ध होवू शकत नाही. आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करत असतो. परंतु समाजातून देखील अशा प्रकारची मदत झाल्यास रूग्णांच्या सोयी उपलब्ध करू शकतो. गरम व थंड पाण्याचे यंत्र व पाण्याची टाकी यामुळे येथील पाण्याची समस्या निकाली निघण्यास मदत होईल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. वाय. तडवी यांनी म्हटले आहे.

Protected Content