अमळनेर नगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर वृक्ष लागवडीच्या कामाला सुरूवात

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपालिका हद्दीतील रस्त्यावर ठोक अनुदानातून १० फूट उंचीची मोठे झाले लावण्याच्या कामाला आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याहस्ते सुरूवात करण्यात आली.

 

याबाबत माहिती अशी की,  आमदार अनिल पाटील यांनी ठोक अनुदानातून चोपडा, टाकरखेडा व धुळे रस्त्यावर वड पिंपळ आणि लिंबाची दहा फुटावरून अधिक मोठी झाडे लावण्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी कंत्राटदार प्रभाकर पाटील यांना उपलब्ध करून दिला आहे. त्यातून कंत्राटदार सदर झाडांना ३ वर्ष खतपाणी देण्यासह त्यांचे संरक्षणही करणार आहे.

 

आमदार पाटील यांच्या शुभहस्ते मंगळग्रह मंदिराजवळ या योजनेचा प्रारंभ झाला. यावेळी मोतीलाल जैन, बाजार समितीचे माजी संचालक शिवाजी पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, राजू देशमुख, अश्विन चौधरी, देविदास देसले, दीपक पाटील(वावडे), डॉ. संजय पाटील ( खेडी), मनोज बोरसे, आशिष चौधरी, गोरख चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, नरेश कांबळे, सुरेश भावसार, कंजारभाट मित्र मंडळाचे राकेश अभंगे, सनी अभंगे ,सचिन अभंगे, प्रथमेश पवार, अशोक मिस्त्री, नाना पाटील, मंगेश मिस्त्री आदी उपस्थित होते . मतदारसंघाचा एकूणच चेहरा-मोहरा हिरवागार व मनोहारी होण्यासाठी ही योजना सहाय्यभूत ठरेल असे यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले. योजना कार्यान्वित केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार पाटील यांचा सत्कार केला.

Protected Content