जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेतर्फे उद्या दिनांक २२ ते २६ फेब्रुवारी २०२२ यादरम्यान अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेतर्फे आयोजित पाच दिवसांच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या अटल ट्रेनिंग अँड लर्निंग च्या माध्यमातून देशपातळीवर अनेक संस्थांना अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम करण्यासाठी आर्थिक सहकार्य केले जाते. संगणकशास्त्र प्रशाळा यांनी डेटा सायन्स या अतिप्रगत विषयातील प्रशिक्षणाचा दिलेला प्रस्ताव मान्य झाला असून देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील प्राध्यापक व संगणक तंत्रज्ञांनी या प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात होणाऱ्या १५ सत्रांसाठी डेटा सायन्स या विषयात गुगल सारख्या नामांकित आयटी इंडस्ट्रीत बिग डेटा प्रोसेसिंग, डाटा अॅनेलिटिक्स, पॅटर्न रेकगनिशन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर संगणकीय अप्लिकेशन तयार करणारे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. भारताखेरीज दक्षिण आफ्रिका, नॅार्वे, लक्झमबर्ग, आणि अमेरिका येथील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे .
उद्या मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता या कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन होउन कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मनिष जोशी व डॉ. मनोज पाटील यांनी कळवले आहे.