नागपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मद्यधुंद महिला मध्यरात्री आपल्या कारने पार्टी करून घरी जात असताना तिने दोन दुचाकीस्वार युवकांना आपल्या कारने चिरडल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली. या अपघातील दोनही युवक जखमी झाले. दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे व त्यांचे वाहनही जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारासा रामझुला परिसराजवळ मोहम्मद हुसैन आणि त्यांचा मित्र मोहम्मद आतीफ मोहम्मद जिया हे दोन्ही दुचाकीवरून (एम.एच ३७ क्यू २९४८) मेयो हॉस्पीटलकडे येत होते. भरधाव येणाऱ्या कारमध्ये (एम.एच.४९, ए.एस. ६१११) मद्यधुंद असलेल्या रितिका यांनी त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यांच्या बाजूला माधूरी बसल्या होत्या. त्याही मद्यधुंद होत्या. त्यात दोघेही युवक गंभीर जखमी झाले.
मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (वय ३४, रा. नालसाहब चौक) आणि मोहम्मद आतीफ मोहम्मद जिया (वय ३२, रा. जाफरनगर) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. माधुरी (वय ३७), रितीका (वय ३९) अशी धडक देणाऱ्या दोन्ही महिलांची नावे आहेत.
रितीका कार चालवित होत्या तर बाजूला माधुरी बसल्या होत्या. दोघीही मद्यधुंद असल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान त्याचे पती दिनेश घटनास्थळी आले. त्या दोन्ही महिलांनी आपली कार सोडून दिनेश यांच्या वाहनात बसून त्या पसार झाल्या. अपघातानंतर नागरिकांच्या जमलेल्या जमावांने दोन्ही युवकांना मेयो हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता मोहम्मद हुसैन याला वैदयकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले तर मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया याच्यावर उपचार सुरू आहे. पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (वय ३४, रा. नालसाहब चौक) आणि मोहम्मद आतीफ मोहम्मद जिया (वय ३२, रा. जाफरनगर) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. माधुरी (वय ३७), रितीका (वय ३९) अशी धडक देणाऱ्या दोन्ही महिलांची नावे आहेत. रितीका कार चालवित होत्या तर बाजूला माधुरी बसल्या होत्या. न्यायालयाने आरोपी महिलांना जामीन मंजूर केलेला ओहे.