डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ते महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार असतील. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा शिवसेना उबाठा गटाला मिळाली आहे. चंद्रहार पाटील यांनी आज ११ मार्च रोजी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

हा प्रवेशपक्ष सोहळा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पार पडला. यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानले. चंद्रहार पाटील म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आपला केलेला सन्मान हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी चंद्रहार पाटील यांचं पक्षात स्वागत केलं. तसेच चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे आपली छाती अभिमानाने फुलली असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केली.

Protected Content