Home Cities अमळनेर पत्रकार संघाचा माणुसकीचा दिवाळी फराळ ! गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद

पत्रकार संघाचा माणुसकीचा दिवाळी फराळ ! गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद

0
पत्रकार संघाचा माणुसकीचा दिवाळी फराळ ! गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि गरजू कुटुंबांचीही दिवाळी गोड व्हावी, या सामाजिक भावनेतून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेरच्या वतीने दिवाळीनिमित्त फराळ व मिठाई वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. पाचपावली चौक परिसरासह चोपडा नाक्याजवळील वर्णेश्वर परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही सणाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत हा उपक्रम आयोजित केला. दिवाळीच्या निमित्ताने फराळ आणि मिठाईचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रातील जबाबदारीसोबतच सामाजिक कार्यातही योगदान देण्याचा आदर्श या उपक्रमातून घालण्यात आला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष डॉ. विजय गाडे, जिल्हा संघटक प्रवीण बैसाणे आणि जिल्हा उपाध्यक्ष विजय संदानशिव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या सामाजिक उपक्रमासाठी विजय पाटील आणि प्रेम सासनाने यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे, तालुका सचिव नूरखान पठाण, उपाध्यक्ष हृदयनाथ मोरे, जितेंद्र बडगुजर, आत्माराम आहिरे, संदीप सैंदाणे, प्रकाश बोरसे यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.