Home Cities रावेर आदिवासी बांधवांसोबत आमदार नंदकिशोर महाजन यांची माणुसकीची दिवाळी!

आदिवासी बांधवांसोबत आमदार नंदकिशोर महाजन यांची माणुसकीची दिवाळी!

0
आदिवासी बांधवांसोबत आमदार नंदकिशोर महाजन यांची माणुसकीची दिवाळी!

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ऐनपूर येथील आदिवासी पाड्यावर विधानपरिषद सदस्य तथा आमदार नंदकिशोर महाजन यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करत माणुसकीचा सुंदर संदेश दिला. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि बंधुभावाचे दर्शन घडले.
यावेळी आदिवासी वस्तीतील लहान मुलांना फटाक्यांचे वाटप करण्यात आले, तर महिला भगिनींना साड्या भेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सर्व कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
विशेष म्हणजे, आमदार नंदकिशोर महाजन यांनी आदिवासी बांधवांसोबत एकत्र बसून भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आनंद पोहोचावा आणि कोणताही बांधव सणाच्या आनंदापासून वंचित राहू नये, हीच या उपक्रमामागील भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार महाजन यांच्या या उपक्रमामुळे आदिवासी वस्तीतील बालकांसह महिला आणि ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. दिवाळी केवळ दिव्यांचा नव्हे, तर माणुसकी आणि आपुलकीच्या नात्यांचा सण असल्याचा संदेश ऐनपूरमधील या उपक्रमातून देण्यात आला.