जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळी सणाचे औचित्य साधून खानदेश रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेतर्फे रेल्वे मालधक्क्यावर अहोरात्र कष्टाचे काम करणाऱ्या माथाडी कामगारांसाठी दिवाळी फराळ व मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जोपासत आणि कामगारांच्या कुटुंबातही आनंदाची दिवाळी साजरी व्हावी, या उदात्त हेतूने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला कामगारांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या दिमाखदार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, नगरसेवक तथा शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी नगरसेवक किशोर बाविस्कर, बंटी गवळी आणि विनोद कोळी आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. खानदेश रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश (आबा) बाविस्कर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
