कर्जबाजारी शेतकऱ्याने कीटकनाशक घेऊन संपविली जीवनयात्रा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील नागदूली येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी झाल्याच्या विवांचनातून शेतातील कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर त्याचा रविवारी दि. ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. भगवान गंभीर महाजन (वय ४५, रा.नागदूली) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भगवान महाजन हे शेती काम करून ते उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान बुधवारी २७ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी शेतामध्ये कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

नातेवाईकांना समजताच त्यांनी भगवान महाजन यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रविवारी उपचार सुरू असताना ३१ मार्च रोजी १२ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content