तरवाडे शिवारातील शेतातून ठिंबक नळ्यांची चोरी; मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील तरवाडे शिवारातील शेतातून १९ हजार रूपये किंमतीच्या ठिंबक नळ्या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवार २ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पृथ्वीराज गोपीचंद पाटील (वय-५०) रा. तरवाडे ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे तरवाडे शिवारात शेत आहे. १ एप्रिल ते २ एप्रिल दरम्यान शेतात ठेवलेले १९ हजार रूपये किंमतीचे ठिंबक नळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरातील सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर रविवारी २ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल रेखा इशी करीत आहे.

Protected Content