जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाडेतत्त्वावर लाईट न देण्याच्या कारणावरून गेंदालाल मिल परिसरात एका महिलेसह तिच्या पतीला शिवीगाळ करून पाईपने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, यास्मिनबी इरफान मलिक वय-३८, रा. गेंदालाल मिल, जळगाव या आपले पती इरफान मलिक यांच्यासोबत वास्तव्याला आहे. दरम्यान याच परिसरात रफिक (पूर्ण नाव माहित नाही) हा वास्तव्याला आहे. दरम्यान रफिकने महिलेकडून भाडेतत्वावर लाईट मागितली. परंतु महिलेने यास्मिनबी मलिक यांनी लाईट देण्यास मनाई केली. याचा राग आल्याने रफिक आणि त्याची पत्नी यांनी यास्मिनबी मलिक आणि त्यांचे पती इरफान मलिक या दोघांना शिवीगाळ करत पाईपाने मारहाण करून दुखापत केली. ही घटना रविवार १४ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता घडली. याप्रकरणी सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वीरेंद्र शिंदे हे करीत आहे.