यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील वढोदा येथील एका रिक्षाचालकाच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सोन्याच्या दागीन्यांसह अडीच लाख रुपयांच्या मुद्देमालाची धाडसी चोरीची घटना घडली आहे. यावल पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल तालुक्यातील वाढोदा गावात प्रदीप दिनकर सपकाळे वय ३५ या रिक्षा चालकाच्या घरातून २८ एप्रिल रोजी रात्री बारावाजे नंतर २९ एप्रिलच्या मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी घराचा दरवाजा पत्राने अडकून लावल्या असताना घरात प्रवेश घेऊन कपाटाचा दरवाजा तोडून कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे २ लाख २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व एक लाख ५० हजार रूपये रोख रक्कम आणी घरातील मोबाइल इतर साहित्य चोरून पसार झाले. याप्रकरणी रिक्षाचालक प्रदीप दिनकर सपकाळे यांनी यावल पोलीसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे व पोलीस करीत आहे.