जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जेवनासाठी पैसे दिले नाही या रागातून गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरूणावर चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना शनीमंदीर परिसरात शुक्रवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमिरखान रहिमखान (वय-२७) रा. गेंदालाल मिल, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खागी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. काही दिवसांपुर्वी रिक्षा चालक सचिन जगन्नाथ शिंपी (वय-२२) याने अमिरखान यांच्याकडे जेवण करण्यासाठी पैसे मागितले होते ते दिले नव्हते. याचा राग सचिन शिंपीच्या मनात होता. दरम्यान, शुक्रवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील शनीमंदीर परिसरात अमिरखान रहिमखान याला सचिन शिंपी आणि त्यांच्यासोबत सिध्दार्थ आरूण सुर्यवंशी हे भेटले. त्यावेळी अमिरखानने सचिनकडे दुर्लक्ष करत बोलणे टाळले. हा राग सहन न झाल्याने सचिन शिंपी याने हातातील चॉपरने पोटावर वार करून जखमी झाले. तसेच सोबत असलेला सिध्दार्थ आरूण सुर्यवंशी याने जखमी असतांना कोणतीही मदत न करता पसार झाले. याप्रकरणी जखमी झालेल्या अमिरखान याने शनिवारी ३० सप्टेंबर रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार रात्री ९ वाजता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीया दातीर करीत आहे.