भुसावळ तालुक्यातील २९ उपद्रवींना शहरबंदी !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील २९ उपद्रवींना शहरबंदी करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काढले आहेत.

आगामी सण-उत्सव, महापुरुषांची जयंती पाहता पोलिसांनी विघ्नसंतोषींच्या शहरबंदी, गाव बंदीचे प्रस्ताव प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे दाखल केले होते. त्यानुसार शहर, बाजारपेठ आणि तालुका पोलिस ठण्याच्या हद्दीतील २९ जणांना ९ ते १६ या काळात शहर बंदीचे आदेश निघाले आहेत. यात सर्वाधिक ८ जण तालुक्यातील वराडसीम येथील आहेत.
कोरोनानंतर यंदा प्रथमच सण-उत्सव, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम पूर्वीच्या उत्साहात साजरे होत आहेत. या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागातील २९ जणांच्या शहर बंदीचे प्रस्ताव तयार करून प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवले होते. या प्रस्तावाला प्रांताधिकार्‍यांनी मंजुरी दिली आहे.

यामुळे २९ जणांना १६ एप्रिलपर्यंत २९ जणांना शहर बंदीचे आदेश काढलेयात शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी ८ असे या प्रस्तावांचा समावेश आहे. ही कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये पंकज सपकाळे, जितेंद्र सपकाळे, गौतम सपकाळे, संतोष सपकाळे, सचिन सपकाळे, विनोद सोनवणे, शरद सपकाळे, नीलेश जाधव हे वराडसीमचे आहेत. यासोबत बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एजाज खान, सिद्धार्थ जाधव, उमेर हासिफखान, आदील शेख युनूस शेख, शाहरूख खान इक्बाल खान, जुनेद फिरोज कुरेशी, धीरज उर्फ सलमान खान, विशाल टाक आणि भुसावळ शहर पोलिस ठाणे हद्दीत करण परदेशी, दीपक उर्फ टापर्‍या सोनवणे, गौरव बढे, सौरभ कुटे, राज भालेराव, शामल कोळी, इम्रान उर्फ इमू पिंजारी, शाहरूख पिंजारी, चंद्रकांत चाळे, योगेश कोळी, करण इंगळे, हर्षल उर्फ छन्नू राणे, आकाश ढिवरे यांना शहरबंदी करण्यात आली आहे. हे आदेश संबंधितांना पोलिसांकडून बजावणे सुरू आहे.

Protected Content