जळगाव प्रतिनिधी । चैत्रबन कॉलनीतील 48 वर्षीय महिलेने घरात कोणीही नसतांना ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती शैलेश त्रिवेदी (वय-48) रा. सुरत गुजरात, ह.मु. चैत्रबन कॉलनी, सौरभ टेन्ट हाऊस गल्लीत हे राहतात. त्यांचा मुलगा यश शैलेश त्रिवेदी आणि सुन आशा शैलेश त्रिवेदी यांचे खासगी न्युट्रीशीयन सेंटर आहे. आज सकाळी 6.30 वाजता दोघेजण कामावर निघून गेले. घरात कोणी नसतांना घराच्या छताला असलेल्या कडीला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. मुलगा यश याने 7.30 वाजता आईला फोन केला. बरेच कॉल केल्यानंतर मोबाईल उचलला नाही म्हणून घरी येवून बघितले असता. आई तृप्तीने घरात आत्महत्या केल्याचे उघडीस आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सुसाईड नोट आढळली
दरम्यान, महिलेने आत्महत्या करण्यापुर्वी गुजराथी भाषेत सुसाईड नोट आढळून आली. “मी माझ्या मर्जीने आत्महत्या करीत आहे. आत्महत्येस मुलगा, सुन पती किंवा कोणालाही जबाबदार धरू नये” असे सुसाईड नोटमध्ये नमूद केले. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.