Home क्राईम पी.सी.पाटील यांची व्हॉटस्अप गृपवरून बदनामी केल्याची पोलीसात तक्रार

पी.सी.पाटील यांची व्हॉटस्अप गृपवरून बदनामी केल्याची पोलीसात तक्रार

0
107

social crime news 11

धरणगाव प्रतिनिधी । भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांच्या विरोधात व्हॉटस्अप गृपवरून बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरोधात धरणगाव पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार धरणगाव पोलीसांनी बदनामीचा गुन्हा नोंदविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील यांची बदनामी करणारा संशयित आरोपी प्रशांत लिलाचंद पाटील हा पंकज महाविद्यालयात शिक्षक असून त्याने 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ‘न्यू अंजनी परीसर गृप’ या व्हॉटस्अप गृपवर पी.सी.आबा पाटील यांच्यावर बेछुट आरोप केले आहेत. त्यानुसार पाटील हे पैसे घेवून कधी राष्ट्रवादीच्या तर कधी अन्य विरोधकांच्या उमेदवारांचे समर्थन करतात. तसेच राष्ट्रवादीचे देवकरांना समर्थन द्यायचे असेल तर त्यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत जावे असेही त्या संदेशात नमूद केले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला कैलास छगन पाटील यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रशांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सपोनि पवन देसले करीत आहे.


Protected Content

Play sound