चोपडा शहरात लवकरच साहित्य संमेलन

sahitya

चोपडा प्रतिनिधी । शहरात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने लवकरच साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. साहित्य संमेलन पहिल्यांदाच होणार असल्याने सांस्कृतिक वातावरण वाढविण्यासाठी हजार हातांनी मदत करावी, असे आवाहन अध्यक्ष आशिष गुजराथी यांनी नुकतेच केले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर वाचन मंदिराची १२८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरुन आशिष गुजराथी बोलत होते की, साहित्य संमेलन पहिल्यांदाच होणार असल्याने सांस्कृतिक वातावरण वाढविण्यासाठी हजार हातांनी मदत करावी. प्रारंभी गांधी चौकातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तसेच अमरचंद सभागृहात गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांना प्रभाबेन गुजराथी, वसंतलाल गुजराथी यांनी प्रार्थना म्हणून श्रध्दांजली अर्पण केली. वार्षिक सभेत अहवाल वाचन कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी केले. आर्थिक दस्ताऐवजाचे वाचन डॅा.परेश टिल्लू यांनी केले. कार्यकारणी मंडळाची निवड आगामी पाच वर्षासाठी एकमताने अध्यक्ष प्रा.आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा.श्रीकांत कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, लोकल ॲडीटर स्नेहल पोतदार, कार्यकारणी सदस्य सोमनाथ बडगुजर, चंद्रहास गुजराथी, श्रीकांत नेवे, धिरेंद्र जैन, ॲड.अशोक जैन, संजय अ.गुजराथी, प्रफुल्ल गुजराथी, मोरेश्वर देसाई, प्रभाकर महाजन, किरण गुजराथी, अवधूत ढबू, विद्या अग्रवाल, रजनी सराफ, विलास पाटील यांची निवड करण्याची सूचना प्रकाश पोतदार यांनी मांडली. अविनाश कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले. त्यातून नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.कुलकर्णी यांनी केले.

 

Protected Content