चाळीसगावात राष्ट्रवादीतर्फे ढोल बजाव आंदोलन

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या वर्षभरापासून शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याप्रकरणी वारंवार तक्रारी करूनही खड्डे बुजवले जात नसल्याने राष्ट्रवादीतर्फे आज ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. येत्या १५ दिवसात खड्डे बुजण्यात आले नाही तर अर्धनग्न आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. 

चाळीसगाव शहरात गेल्या वर्षापासून रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे. नागरिकांनी याबाबत नगरपालिकेला वारंवार लिखित स्वरूपाची तक्रारी केल्या. मात्र प्रतिसाद शुन्य मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून तहसील कार्यालयापासून नगरपालिका दरम्यान ढोल बजाव आंदोलन सोमवार रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. यावेळी चाळीसगाव खड्डे मुक्त झालेच पाहिजे अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. दरम्यान येत्या पंधरा दिवसांत खड्डे बुजवण्यात आले नाही तर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांना इतर कामांसाठी पैसे आहेत. परंतु चाळीसगावातील विविध भागातील रस्त्यांसाठी पैसे नाहीत अशी खोचक टीकाही करण्यात आली. चाळीसगाव शहरात गेल्या वर्षभरापासून खड्ड्यांच्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. परंतु नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतामुळे हि समस्या मार्गी लागत नसल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले. 

सदर आंदोलन हे माजी आमदार राजीव दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, नगरसेवक भगवान पाटील, भाऊसाहेब पाटील, ॲड. प्रदिप अहिरराव, नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेवक प्रदिप राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष मोहित भोसले, नगरसेवक दिपक पाटील, विरेंद्रसिंग राजपूत, भाणाली चौधरी, सरदारसिंग राजपूत, योगेश पाटील, दीपक सूर्यवंशी, राजू शैहनवाज, भुषण ब्राह्मणकार, शेखर देशमुख, अजय पाटील, ईश्वर ठाकरे, भाऊसाहेब केदार, संजय जाधव, प्रशांत पाटील, भैय्यासाहेब पाटील, कुणाल पाटील, सुरेश गायकवाड, भुषण पाटील, निखिल देशमुख, धनंजय देशमुख, छोटू पाटील, सिरा जोडींग, राकेश राखुंडे, सदाशिव गवळी, शेखर सोनवणे, शशिकांत साळुंखे, सुरेश चौधरी, जगदीश चव्हाण, सुजित पाटील, शुभम पवार, मंगेश, सुरज शर्मा, गुंजन मोरे, सिद्धार्थ देशमुख, प्रकाश पाटील, उमेश राजेंद्र व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content