कासोद्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई

कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍यांवर कासोदा पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी लागू असतांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार कासोद्यात विनाकारण फिरणार्‍या लहान मोठ्या वाहनांवर सुमारे १८ मोटर सायकलिंवर मोटार वाहन प्रतिबंध अधिनियम कलम २०७ प्रमाणे कासोदा पोलिसांनी कारवाई केली आहे. यात विना परवाना धारक , विना लायसन्स धारक , विनाकारण जमावबंदीत मोटरसायकल घेऊन फिरणार्‍या वर कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांच्या सोबत पीएसआय नरेश ठाकरे, पो.कॉ.जितेश पाटील, पो.कॉ. समाधान भागवत , पो.कॉ. नितीन पाटील , मुन्ना पाटील यांच्या पथकाने संध्याकाळी ६ ते रात्री ८ वाजेदरम्यान महेश मंदिरा समोर कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे विनाकारण गावात फिरणार्‍यांना चांगलाच चोप बसला आहे. कासोदा पोलीस स्टेशनच्या कार्यवाही मुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे . सर्वांनी घरात रहावे विनाकारण घराबाहेर पडूनये शासन व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन सपोनि रविंद्र जाधव यांनी ग्रामस्थांना केले आहे.

Protected Content