पाण्याची मोटार चोरट्यांनी लांबविली; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील दाळफळ नगरातून अज्ञात चोरट्यांनी पाण्याच्या मोटारीची चोरी केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, प्रकाशचंद भादचंद पुरोहित (वय-६०) रा.दाळ फळ परिसर शिवाजी नगर,जळगाव हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २७ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची मालकीची पाण्याची मोटार चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. त्यांनी परिसरातील सर्वत्र शोध घेतला असता मोटारीची कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी ३० सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अलका वानखेडे करीत आहे.

Protected Content