दोन भावांवर चॉपर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ दोघांना पोलीस कोठडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर येथे कारण नसताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी दोन्ही भावांवर चाकू हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात अटकेत असलेल्या दोन जणंना जळगाव जिल्हा न्यायलयात हजर केले असता ३ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मिथुन फकीरा परदेशी (वय-२५)  हा तरुण आपल्या परिवारासह जळगाव तालुक्यातील रायपूर येथे वास्तव्याला आहे. तो एमआयडीसीतील एका चटई कंपनीत कामाला आहे. गुरुवार २८ सप्टेंबर रोजी मिथुन परदेशी याचा भाऊ विशाल परदेशी आणि त्याचे मित्र काही रात्री १ वाजेच्या सुमारास गप्पा मारत असताना दुर्गेश कैलास परदेशी आणि श्रीकांत मनोहर धनगर दोघे रा. रायपूर ता.जि.जळगाव हे दोघे जण दुचाकीने चकरा मारत होते. यावेळी विशाल परदेशी याने चकरा का मारत आहे. असा बोलण्याचा राग आल्याने संशयित आरोपी दुर्गेश कैलास परदेशी आणि श्रीकांत मनोहर धनगर या दोघांनी विशाल परदेशी व  मिथुन परदेशी या दोन्ही भावांवर चॉपर हल्ला करून पाठीवर व हातावर वार करून जखमी केले होते. याप्रकरणीएमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी दोघांना अटक केली होती. शनिवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर केले असता दोघांना ३ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पुढील तपास पोहेकॉ गफ्फार तडवी करीत आहे.

Protected Content