धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ भरधाव कार चुकीच्या मार्गाने नेल्याने कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात सारवे येथील १९ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार ४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता घडली होती. या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कारचालकावर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज महेंद्र शिरसाट वय-१९ राहणार सारवे ता. धरणगाव असे माहीत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील सारवे येथील राज शिरसाट हा आपल्या आई, मामा आणि आजी यांच्या सहवास्तव्याला होता. दरम्यान गुरूवार ४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजे सुमारास राज शिरसाट हा गावातील सुरेश अशोक अहिरे यांच्यासोबत कार क्रमांक (एमएच ०९ डीएक्स ८९९१) वरून सारवे गावातून जळगावकडे निघाले होते. दरम्यान रस्त्यावरील मुसळी फाट्याजवळ चालक सुरेश अशोक अहिरे याने चुकीच्या मार्गाने कार नेली. त्यामुळे त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार ही ही झाडावर आढळली. त्यामुळे या अपघातात राज महेंद्र शिरसाठ यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर कारचालक सुरेश अहिरे हा कार सोडून पसार झाला. दरम्यान या घटनेमुळे मयत तरुणाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. मयत राज शिरसाट यांचे मामा ज्ञानेश्वर शंकर मरसाळे यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बुधवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता कारचालक सुरेश अशोक अहिरे यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय चौधरी हे करीत आहे.