नवी मुंबईत तीन कामगारांची निर्घृण हत्या

नवी मुंबई प्रतिनिधी । नवी मुंबईतल्या तुर्भे परिसरात तीन कामगारांचा खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तुर्भे एमआयडीसीच्या अंतर्गत असणार्‍या बोनसरी या परिसरात आज पहाटे तीन कामगारांचा खून झाल्याचे उघडकीस आले. येथील एका भंगाराच्या गोदामात हे तिन्ही कामगार रात्री झोपले होते. झोपेतच डोक्यावर दगड टाकून व चाकूंनी वार करून या तिघांची हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. खून झाल्यानंतर तिघांचे मृतदेह परिसरात लपवून ठेवण्यात आले होते. मात्र हा सर्व प्रकार सकाळी लोकांना दिसल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला प्रारंभ केला आहे.

Protected Content